नवाजुद्दीनला आलेल्या बॉलिवूडच्या अनुभवाचा केला खुलासा…

nawazuddin-siddiqui

मुंबई : कोणतंही बॅकिंग नसतांना इंडस्ट्रीमध्ये टिकणं तस अवघडच. मात्र आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. तो बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील एक आहे. मात्र नवाजुद्दीनचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

दरम्यान ‘ सीरियस मॅन’मधील को-स्टार इंदिरा तिवारी विषयी वक्तव्य केले आहे. ‘सुधीर साहेब यांना चित्रपटसृष्टीचे प्रंचड ज्ञान आहे आणि त्यांचे विचार ही खूप चांगले आहेत. त्यांनी इंदिराला चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतले. आपल्या इंडस्ट्रीमध्ये वर्णभेद केला जातो. जर या चित्रपटानंतर तिला पुन्हा मुख्य भूमिकेत एखादा चित्रपट मिळाला तर मला आनंद होईल. सुधीर यांनी तिला घेतले. इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीपेक्षा जास्त वर्णभेद ही समस्या आहे’ असे नवाजने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.

तसेच ‘मी गेल्या कित्येक वर्षांपासून या गोष्टींचा सामना करतोय. अशा अभिनेत्रींना देखील भूमिका मिळतील अशी मला आशा असून हे खूप महत्त्वाचे आहे. मी त्वचेच्या रंगाविषयी बोलत नाही. ‘सीरियस मॅन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि इंदिरा तिवारी मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटासाठी सुधीर मिश्रा यांना एमी अवॉर्ड २०२१साठी नॉमिनेशन मिळाले. मात्र आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भारदस्त अभिनयामुळे त्याच्या चाहत्यांचा आवडीचा अभिनेता ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या