PNB घोटाळा तर फक्त झलकच; पाच वर्षात ८६७० प्रकरणांत 61,260 कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेमधील नीरव मोदीचा ११ हजार ३०० कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर संपूर्ण अर्थजगत हादरून गेले आहे. बँकिंग क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जात आहे. मात्र, आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे नीरव मोदी प्रकरणातील घोटाळा केवळ झलकच असून मागील पाच वर्षात तब्बल 8,670 वेगवेगळे कर्जघोटाळे झाल्याच ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने माहिती अधिकारामध्ये मागवलेल्या माहितीत समोर आल आहे.

रॉयटर्सने रिझर्व्ह बँकेकडून मिळवलेल्या माहितीनुसार मागील पाच आर्थिक वर्षांमध्ये सरकारी बँकांमध्ये 8,670 कर्जघोटाळे झाले असून एकूण 61,260 कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे.

बँकेला गंडा घालण्याच्या विचार करून काही ग्राहकांकडून अशा प्रकारे कर्ज काढून ती थकवली जातात. यामुळेच बँकांच्या थकित किंवा बुडीत कर्जांचे प्रमाण वाढले आहे. 2012 – 13 मध्ये थकित कर्जांचे 6,357 कोटी असणारे प्रमाण आता वर्षाला 17,634 कोटींवर गेले आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार 2० सरकारी बँकांकडून माहिती अधिकारात अशा प्रकरणाची माहिती मागवण्यात आली होती. यामध्ये 15 बँकांनी ही माहिती दिली असून 389 घोटाळेबाज प्रकरणांसह पंजाब नॅशनल बँक आघाडीवर आहे. तर बँक ऑफ इंडियाला 4,050 कोटी रुपयांचा फटका बसला असून बँक ऑफ बडोदाला बँकेला 4,473 कोटी रुपयांना गंडवण्यात आल आहे. तर सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यांची एकूण संख्या 1,069 आहे.

You might also like
Comments
Loading...