७९ लाख दहा हजार दोनशे साठ रुपये रुग्णांना परत करा, रुग्ण हक्क संघर्ष समितीची मागणी

लातूर : राज्यात महाराष्ट्रात कोव्हीड महामारीने थैमान घातले आहे, या करीता महाराष्ट्र शासनाने खासगी हॉस्पिटल्सला कोरोना उपचाराची परवानगी दिली. तसेच त्याचे शासकीय दर निश्चित केले परंतु हॉस्पिटल्सने मनमानी दर लावून रुग्णाची आर्थिक लुट केली असल्याचे रुग्ण हक्क संघर्ष समितीने माहिती अधिकारातून ऊघड केले आहे. प्रशासनाने सर्वच हॉस्पिटल्सची माहिती न देता काही हॉस्पिटल्सची माहिती दिली ती जवळ जवळ ८० लाखापर्यंत असल्याची माहिती यात समोर आली आहे. हा पैसा रुग्णांना परत करण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

माहिती अधिकारातील प्राप्त माहितीनुसार जानेवारी २०२१ पर्यंत लातूरच्या विविध हॉस्पिटलचे ७९,१०,२६० रुपये रुग्णांचे परत करायचे आहेत. सदर माहिती रुग्णांच्या नावासह कोणाचे किती बाकी आहेत याची यादी समिती कडे प्राप्त आहे. ही जानेवारी २०२१ पर्यंततची माहिती असून अद्याप दुसऱ्या लाटेची माहिती बाकी आहे. म्हणून सर्व हॉस्पिटल्सचे तत्काळ जुन २०२१ पर्यंतचे ऑडिट करुन रुग्णांचे जास्त आकारणीचे पैसे रुग्णांना परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच रुग्णांना न्याय द्यावा व अश्या हॉस्पिटल्सची आयकर विभागामार्फत आर्थिक चौकशी करुन दोषी आढळणाऱ्या हॉस्पिटल्सची मान्यता कायमची रद्द करुन डॉक्टरांवर गुन्हे नोंद करावेत अन्यथा रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलाय. या संबंधीची माहिती रुग्ण हक्क संघर्ष समिती कोअर कमिटी सदस्य ॲड.निलेश करमुडी यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP