निवृत्त पोलिस अधिकारी कांचनकुमार चाटेंचा भाजपला धक्का; हजारो समर्थकांसह पैठण येथे करणार काँग्रेस पक्षात प्रवेश!
औरंगाबाद : पैठण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्यसैनिक त्र्यंबकदास पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी दुपारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. त्यासोबतच निवृत्त पोलिस अधिकारी कांचनकुमार चाटे रविवारी भाजपला सोडचिठ्ठी देऊन पटोले यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भगवान सानप व संभाजी काटे यांनी दिली आहे.
यावेळी किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे व जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची यावेळी विशेष उपस्थिती असेल. यानंतर दुपारी ४:३० वाजता पैठण शहर व तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे यांच्या उपस्थितीत आशिर्वाद मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन पैठण तालुका काँग्रेस कमिटी व शहराध्यक्ष निमेश पटेल यांच्या तर्फे करण्यात आले आहे. त्यासोबतच निवृत्त पोलिस अधिकारी कांचनकुमार चाटे यांच्या प्रवेश सोहळ्याची देखील पैठण काँग्रेस कमिटीतर्फे जोरदार तयारी सुरू आहे. भाजपला रामराम ठोकून आपल्या हजारो समर्थकांसह ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने सारा सोशल मीडियावर ट्रोल
- ‘दिल्लीत कधीकधी डोमकावळ्यांची फडफड बघतो, पण…’, संजय राऊतांचा घणाघात
- भारत-पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणे खूप कठीण : सौरव गांगुली
- छत्तीसगढमधील तब्बल 18 हत्तींचा एक कळप गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखल
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार ‘सात’ लस उत्पादकांची भेट; महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता