पोटनिवडणुकीतील निकाल आम्ही लोकसभेची चाचणी परीक्षा मानत नाहीत – भाजप

नवी दिल्ली – गुरुवारी देशात एकूण १४ जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकिची मतमोजणी पार पडली. यामध्ये लोकसभेच्या ४ जागा तर विधानसभेसाठी १० जागा होत्या. विजयाची घौडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत चांगलाच झटका बसला आहे. भाजपला फक्त २ जागांवर विजय मिळवता आला आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघ व उत्तराखंडमधील थराली लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. तर बाकी सर्व जागांवर काँग्रेस व स्थानिक पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान पोटनिवडणुकीतला भाजपचा पराभव म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदी असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

दरम्यान विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हंटल आहे की, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांचे ताजे निकाल ही आम्ही चाचणी परीक्षा मानत नाही. त्यांचा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांशी संबंध नाहीये. पुढच्या वर्षी केंद्रात भाजप बहुमतांनी सरकार स्थापन करेल असं ही, त्यांनी यावेळी म्हंटल.