संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सेवांचा निकाल जाहीर;महाराष्ट्रातील १७ पुरुष व ३ महिलांची निवड

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाच्या विविध सेवांकरिता घेण्यात आलेल्या एकत्रित परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला. देशभरातील 172 उमेदवारांची निवड झाली असून महाराष्ट्रातील 17 पुरुष उमेदवार व 3 महिला उमेदवारांचा यात समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या विविध सेवांकरिता उमेदवारांच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2018 मध्ये लेखी परीक्षा घेतली होती. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतल्या असून आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. देशातील 130 पुरुष व 42 महिला अशा एकूण 172 उमेदवारांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील 17 पुरुष उमेदवार व 3 महिला उमेदवारांचा यात समावेश आहे.

Loading...

गुणांकन यादीनुसार महाराष्ट्रातील निवड झालेल्या पुरुष उमेदवारांची नावे

देशातील 130 पुरुष उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण 17 उमेदवारांचा समावेश आहे. मयुर मनोहर हिवळे(9), योगेश शिवाजी वानवे (18), सिध्देश कावळकर (22), विनोद राजेंद्र शिंदे (51), ओंकार दिगंबर उधान (57), अक्षय बब्रुवाहन टाळके (61),अनिवेश अरविंद होळे (64), मयुर राजेश तलवाले (81), अभिजीत दत्तात्रय ताम्हणकर (90), रिषभ भारत भालेराव (96), कैवल्य सतिश कुळकर्णी (98), हर्षवर्धन अनिल चव्हाण (109), उदित हेमंत देसाई (110), संकेत भरत जाधव (115), भरत शंकर गंटी (117), अभिनव प्रधान (119), श्रेयस बब्रुवाहन पाटील (130).

गुणांकन यादी नुसार निवड झालेल्या महिला उमेदवारांची नावे

देशातील 42 महिला उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण तीन उमेदवारांचा समावेश आहे. प्रिती पवार (5) राधिका सतिश तळेकर (7) अन्वेशा प्रधान(25).

निवड झालेले पुरुष उमेदवार संरक्षण मंत्रालयाच्या चेन्नईस्थित अधिकारी प्रशिक्षण संस्थेच्या 109 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स मध्ये सहभागी होतील तर महिला उमेदवार याच संस्थेच्या 23 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स मध्ये सहभाग घेतील. हा प्रशिक्षण कार्यक्रम एप्रिल 2019 पासून सुरु होणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील