मराठा आरक्षणाचा निकाल हा समाजाच्या बाजूनेच लागणार : विनोद पाटील

पुणे : राज्यातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशांत १६ टक्के आरक्षण देणारा मराठा आरक्षण कायदा हा घटनात्मक व कायदेशीरदृष्ट्या वैध आहे की नाही, याविषयी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाकडून गुरुवार, २७ जूनला निर्णय दिला जाणार आहे.

Loading...

या आरक्षणाच्या विरोधात व समर्थनात केलेल्या सर्व जनहित याचिकांवर एकत्रित अंतिम सुनावणी घेतल्यानंतर खंडपीठाने २६ मार्च रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, अनेक दिवसांपासून प्रतिक्षित असलेला मुंबई उच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल २७ जून रोजी लागणार आहे. मला विश्वास आहे की कायद्याच्या चौकटीत निकाल हा समाजाच्या बाजूनेच लागणार असं मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी म्हटले आहे .Loading…


Loading…

Loading...