‘या’ बँकेवरील निर्बंध आरबीआयकडून मागे; ग्राहकांना मोठा दिलासा

आरबीआय

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशातील अनेक बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये अनेक बँकांवर निर्बंध आले असल्याने ग्राहकांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र या दरम्यान कोल्हापुरातील युथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

या बँकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2019 पासून बँकेवर निर्बंध लादले होते. यामध्ये ग्राहकांना 5,000 रुपयांपर्यंतच्या पैसे काढण्याच्या मर्यादेसह अनेक निर्बंध घातले होते. सहा महिन्यांसाठी लादण्यात आलेले हे निर्बंध आतापर्यंत वेळोवेळी वाढत राहिले मात्र आता रिझर्व बँकेने निर्बंध मागे घेतल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना नवीन कर्ज, कर्जाचे नूतनीकरण, 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार आहेत. आरबीआयने एका परिपत्रकात परिस्थिती समाधानकारक वाटल्यानंतर लोकांच्या हितासाठी 5 एप्रिल 2021 पासून कोल्हापूर येथील युथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांना दिलेल्या सर्व सूचना मागे घेण्यात आल्या आहेत. असे जाहीर केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या