अंतिम सामन्यापूर्वी ब्रिस्बेन हॉटेलमध्ये टीम इंडिया वर ‘निर्बंध’…

टीम इंडिया

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया मंगळवारी ब्रिस्बेन येथे पोहोचली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये खेळाडूंना हाऊसस्किपिंग, स्विमिंगपुल यासारख्या सुविधा मिळत नसून जेवण देखील जवळच्या भारतीय हॉटेल मधून येत आहे.

कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी हे नियम घालून दिल्याचं सांगण्यात येत आहे. तर ब्रिस्बेन हा भाग कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान १-१ असा बरोबरीत असलेल्या सिरिजचा निर्णायक सामना १५ जानेवारीला पार पडणार आहे.

आज या संदर्भात बीसीसीआयने खेळाडूंच्या सरावाचे फोटो शेअर करत ट्विट केल आहे. यामध्ये दुखापत ग्रस्त जसप्रीत बुमराह देखील मैदानावर सराव करताना दिसत आहे. यामध्ये त्यांनी ‘आम्ही गाबा येथे होणाऱ्या अंतिम सामन्याची तयारी सुरू केली आहे.’ असे संगीतले.

महत्वाच्या बातम्या