नवी दिल्ली: बहुतेकदा ग्राहकांकडून ऑनलाईन खरेदी केली जाते ती केवळ विविध सवलतींच्या अपेक्षे पोटी मात्र अनेकदा या ऑनलाइन पोर्टलकडून खरंच कॅशबॅक असते का असा प्रश्नच असतो. त्याचबरोबर या ऑनलाईन खरेदी तसेच त्यांच्या कडून दिल्या जाणाऱ्या नवीन ऑफर्स मूळे स्थानिक विक्रेत्यांचा व्यवसाय वर देखील मोठा परिणाम होतो.
या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात CAIT ने अ;ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगीसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यावर मोठा आरोप लावला आहे. या कंपन्या कायदेशीर मेट्रोलॉजी कायदा 2011 आणि FSSAI ने जारी केलेल्या सूचनांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप कॅटने केला आहे. या कायद्यानुसार ई-कॉमर्स पोर्टलला आता अनिवार्यपणे विक्रेता आणि वस्तूसंबंधी प्रत्येक माहिती स्पष्टपणे, प्रत्येक उत्पादनावर लिहिणं अनिवार्य आहे. परंतु या कंपन्या या नियमाचं उल्लंघन करत असल्याचं म्हणत, केंद्र सरकारने याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लीगल मेट्रोलॉजी कायदा 2011 च्या नियमानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या पोर्टलवर विकल्या जाणाऱ्या प्रत्येक उत्पादनाचं नाव स्पष्टपणे लिहिणं, पत्ता, मूळ देशाचं नाव, वस्तूचं नाव, शुद्धतेचं प्रमाण, कधीपर्यंत वापरावं, किरकोळ किंमत किती, वस्तूचं वजन-आकार, मुख्यालयाचा पत्ता, पोर्टलचं नाव, ईमेल, फॅक्स, लँडलाईन नंबर, कस्टमर केयर नंबर अशा गोष्टी लिहणं अनिवार्य आहे
या कायद्यांतर्गत प्रत्येक पोर्टलला तक्रार अधिकारी नियुक्त करणं आवश्यक आहे. कोणत्याही ई-कॉमर्स साईटने या तरतुदीचं पालन करणारा नोडल अधिकारी नियुक्त केला नसल्याचा दावा कॅटने केला आहे. ई-कॉमर्सवरून उत्पादनं खरेदी करताना विक्रेता किंवा त्या उत्पादनाचा तपशील नसल्याने ग्राहकांच्या महत्त्वपूर्ण अधिकाराचं उल्लंघन केलं जात असल्याचंही कॅटने म्हटलं आहे. कॅटने पीयूष गोयल यांना पत्र लिहून या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हा नियम जून 2017 मध्ये लागू करण्यात आला होता आणि या नियमाचं पालन करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देण्यात आला होता, मात्र या कायद्याला तीन वर्ष उलटून देखील अ;ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या याचं पालन करत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. हा गुन्हा मानक नसलेलं पॅकेज देण्याबाबत आहे, त्याअंतर्गत उल्लंघन केल्यास दंड, जेल किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूदतही करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा मराठा विद्यार्थ्यांसोबत विरोधी पक्षनेते उपोषणाला बसणार !
- तजेलदार त्वचेसाठी करा ‘हे’ उपाय
- पंकजा मुंडेंची ओबीसी जनगणनेची मागणी; गोपीनाथ मुंडेंचा जुना व्हिडीओ ट्वीट
- यंदा लाल रंगाच्या कपड्यातील अर्थसंकल्पाची परंपरा मोडणार !
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळकेंनी राम मंदिर निर्माणासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी !
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<