खाजगी क्लासेस चालकाच्या मनमानी कारभाराला लागणार लगाम!

classes

टीम महाराष्ट्र देशा : खाजगी क्लासेसमुळे अनेक सामान्य विद्यार्थांची लुट होत असते. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे खाजगी क्लासेसवर शासनाचे निर्बंध असावे म्हणून अनेक पालकांची मागणी होती. त्यासाठी राज्याच्या शिक्षण खात्याने  नवी नियमावली तयार केली आहे. याला खाजगी क्लासेस चालकांचा विरोध होण्याची श्यक्यता वर्तविण्यात होत आहे.

खाजगी क्लासेसच्या माध्यमातून राज्यात बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची फसवणूक होत असते. तसेच खाजगी क्लासेसमुळे महाविद्यालयाचे महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे. एकीकडे विद्यार्थी महाविद्यालयात नियमित येत नसल्यामुळे महाविद्यलयात नियमित शिकवणी वर्ग होत नाहीत. अशी अनेक महाविद्यालयाची भूमिका आहे. तर दुसरीकडे महाविद्यालय पूर्णपणे अनुदानित असून सुद्धा शिकवणी वर्ग घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी प्रथम बाहेरील खाजगी क्लासेसना प्राधान्य देतात. राज्याच्या शिक्षण खात्याने खाजगी क्लासेसवर निर्बंध घालण्यासाठी नव्या नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. या मसुद्याचे कायाद्यात रुपांतर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण त्याला आता राजकीय पातळीवरही विरोध होण्याची शक्यता आहे.

काय असतील नवीन नियम ?

१.क्लासेसच्या वेळा या शाळा महाविद्यालयांच्या वेळांपेक्षा वेगळ्या असणार 
२.शिकवण्यांवर धाडी टाकण्याचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना असतील 
३.शिकवणीबाबत पालक आणि प्रशासनाचे अभिप्राय नोंदवले जातील, त्यावर क्लासेसची मान्यता  ठरेल
४.१८ टक्के जीएसटी व्यतिरिक्त पूर्ण उत्पन्नाच्या ६ टक्के अधिक शिक्षण विकास निधी द्यावा लागेल  
५.फी ठरवण्याचा अधिकार क्लासेस चालकांना नसणार 
६.फी वाढीचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना असतीलLoading…
Loading...