fbpx

विरेंद्र सेहवाग घेणार शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

टीम महाराष्ट्र देशा – भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज विरेंद्र सेहवाग याने पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचे मान्य केले आहे. सेहवागने ट्वीटरवरुन याबबत माहिती दिली आहे . यावेळी सेहवागने म्हटलं आहे की, शहीदांच्या कुटुंबासाठी आपण इतकी गोष्ट करु शकतो.

जम्मू काश्मीरमधील पुलमावा येथे दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सीआरपीएफचे तब्बल 40 जवान या भ्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत.

देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शहीद कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्य सरकारसह सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. गौतम गंभीर आणि रिलायन्सचे प्रमुख अनिल अंबानी यांनी शहीद जवानांच्या कुटंबीयांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक जवानांच्या कुटुंबीयांना पाच लाख देण्याचे जाहीर केले आहे.

1 Comment

Click here to post a comment