सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर आम्ही खुश नाही, पण…

blank

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने आज आयोध्या जन्मभूमी विवादीत जमीन प्रकरणाचा निकाल दिला आहे. यात विवादीत जमीन ही राम जन्मभूमीच असून बाबरी मशिदीकरिता वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच या निकालाबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, ‘केंद्र सरकार ३-४ महिन्यांत ट्रस्ट स्थापन करुन मंदिर बांधण्यासाठी वादग्रस्त जागा या ट्रस्टकडे सोपवण्यात यावी. मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने नियमावली तयारी करावी,’ असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. पण कोर्टाच्या या निर्णयावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना लॉ बोर्डाचे सदस्य जफरयाब जिलानी यांनी असं म्हटलं आहे की, ‘या निर्णयाबाबत रिपिटीशियन करायचं की नाही यासंबंधी आम्ही योग्य तो सल्ला घेऊ. आम्ही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा पूर्णत: आदर करतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी इक्बाल अन्सारी म्हणाले की, ‘अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय देण्यात आला आहे त्याने मी खुश आहे. मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो,’ असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या