fbpx

नक्षलवादी चळवळीबद्दल आदर ; त्यांच्या मागण्यांना पाठींबा! आठवलेंचे वादग्रस्त विधान

नांदेड: आंबेडकर कार्यकर्त्यांच्या छळ सहन करणार नाही. नक्षलवादी चळवळीबद्दल आदर असुन त्यांच्या त्यागाचा आदर करतो. तसेच त्यांच्या मागण्यांना आमचा पाठींबा आहे. असे वादग्रस्त विधान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रामदास आठवले नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग,माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

1 Comment

Click here to post a comment