‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा जनता मंत्र्यांना ठोकून काढेल’

टीम महाराष्ट्र देशा- शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न विनाविलंब सोडवा, अन्यथा जनता मंत्र्यांना ठोकून काढेल, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. कोहापुरात पत्रकारांशी बोलताना सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली .
नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी ?
जेव्हा मुख्यमंत्री गोड बोलतात, तेव्हाच गोडपणाविषयी भीती वाटायला लागते. शासनाने शेतकऱ्यांचे समाधान होईल अशी पावले टाकली असती तर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. शेतकऱ्यांनी आंदोलने किती करायची यालाही मर्यादा आहेत. त्याची अंतशक्ती पाहू नका. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न विनाविलंब सोडवा, अन्यथा लोक मंत्र्यांना ठोकून काढतील.