मुंबई : विदर्भ-मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना उद्या पत्र देणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली. उद्या कॅबिनेटची बैठक आहे ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे. असा खोचक टोलाही अजित पवार यांनी यावेळी ‘दोघांच्या’ सरकारला लगावला.
विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती अजित पवार यांनी आज माध्यमांना दिली. अजित पवार यांनी विदर्भ, मराठवाड्यात शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. हे सांगतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला परंतु त्यांनी केंद्रसरकारला अद्याप कळवले नाही, त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करण्यास आली नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Shahajibapu patil | “२२ वर्ष ते काम करतंय अन् आमचं बघा…”; शहाजीबापूंचा ठाकरेंना टोला अन् पवारांचे कौतुक
- Shahjibapu Patil । अजित दादा माणूस खूप चांगला, पण देवाने त्यांना नरडं लय करंड दिलंय; शहाजीबापूंचा टोला
- Praniti Shinde | त्यांचे जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनतेच नॉट ओके – प्रणिती शिंदे
- Shahajibapu Patil | आम्ही एकनाथ शिंदेंना घेऊन गेलो, ते आम्हाला नाही – शहाजीबापू पाटील
- Shahjibapu Patil | “आम्ही मेलेल्या आईचं दूध नाही पिलं, ठोका देणारच”; शहाजीबापूंचा राष्ट्रवादीला इशारा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<