कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही लिंगायत समाजाला आरक्षण द्या- मुंडे

0Dhananjay_Munde_0

मुंबई – कर्नाटक राज्याच्या संवैधानिक धर्तीवर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली. नियम २८९ अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात ही मागणी केली आहे .

काय म्हणाले धनंजय मुंडे
कर्नाटक राज्य सरकारने लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देत असताना मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौध्द आणि शिख समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता लिंगायत समाजाला आरक्षण दिले आहे.कर्नाटक राज्याच्या संवैधानिक धर्तीवर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात यावे. सरकारने ९ ते १४ ऑगस्ट २०१४ मध्ये कराड येथील लिंगायत आंदोलनात सत्तेत आल्यावर मागण्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले?