अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न लवकर निकाली काढा; राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

bhagt sigh koshyari

मुंबई : कोरोनामुळे पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या राहिल्या आहेत. यावर राज्य सरकारने लवकर निर्णय घेऊन हा प्रश्न निकाली काढावा, अशा सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित केल्या आहेत. त्यात त्यांनी उच्च शिक्षण मंत्री उद्य सामंत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणे हे चुकीचे आहे, असे राज्यपाल यांनी आपल्या पत्रात म्हंटल आहे.

पत्रात राज्यपालांनी लिहिले की, मंत्री सामंत यांच्या भूमिकेवर राज्यपालांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सामंत यांनी परिक्षा रद्द करण्याबाबत युजीसीला पाठविलेले पत्र म्हणजे अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे. याबाबत मंत्री सामंत यांना योग्य ती समज देण्याची सूचनाही राज्यपालांनी केली आहे. परिक्षा न घेण्याची भूमिका ही युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग आहे.

तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान करणे योग्य होणार नाही असे मतही राज्यपालांनी व्यक्त केले. भविष्यात या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण आणि रोजगारावर अशा निर्णयाचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. मुलांचे भविष्यच धोक्यात येण्याची शक्यता राज्यपालांनी यानिमित्ताने वर्तविली आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा सूचना राज्यपालांनी दिल्या आहेत.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा रद्द करून ग्रेड प्रदान करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. तर उद्य सामंत यांनी पुन्हा युजीसीला अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे शक्य नसल्याचे सांगत या परीक्षा देखील रद्द करा, अशी मागणी केली होती.

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आम्हाला अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा घेणं शक्य होणार नाही. असा निर्णय घेतलाच तर, कोरोनाची वाढती संख्या पाहता विद्यार्थ्यांपुढे आणखी एक संकट असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर असणारं दडपण, ताण पाहता परीक्षा रद्द करण्यात यावी अशी विचारणा युजीसीकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘मुंबईत कोरोनाचा जीवघेणा थरार; महापालिका उलटीपालटी, सत्ताधारी फरार’

‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’, अमोल मिटकरींची भाजपवर सडकून टीका