fbpx

पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या टीम इंडीयाच्या अभिनंदनाचा विधानसभेत ठराव

मुंबई : भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी पाकिस्तानचा पराभव करून विजय मिळवला. दुसरीकडे, राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. त्यामुळे भारतीय संघाचे अभिनंदन करणारे ठराव आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आला आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी हा ठराव मांडला.या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. तसेच पुढील सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा सुद्धा यावेळी देण्यात आल्या.