शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात ठराव

टीम महाराष्ट्र देशा :  तालुक्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रविवारी आयोजित जिल्हास्तरीय अधिवेशनात करण्यात आली.

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हास्तरीय अधिवेशन रविवारी आयोजित करण्यात आले होते. ज्ञानेश्वर काळे यांनी प्रास्ताविक केले. अधिवेशनाची रूपरेषा बाळासाहेब धस यांनी सांगितली. जिल्ह्याचा आढावा जिल्हा चिटणीस अविनाशराव देशमुख यांनी सविस्तर मांडला. अमोल दीक्षित यांनी चार ठराव मांडले.

शेतकऱ्यांकडील वीज देयक व कर्ज माफ करावे, शेतकरी, शेतमजुरांच्या मुलाचे उच्चशिक्षण मोफत करावे, हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत त्वरित द्यावी, असे ठराव घेण्यात आले. मराठवाडा विभागीय चिटणीस काकासाहेब शिंदे यांचेही भाषण झाले. एस. व्ही. जाधवर यांनी पक्षाचे ध्येय धोरणाबद्दल माहिती सागितली.

कार्यालयीन चिटणीस राजीव कोरडे यांनी पक्षबांधणी व सध्या पक्षाची झालेली पिछेहाट व त्यातून आपण पक्षाला बाहेर कसे काढायचे, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधिवेशन घेऊन नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष सभासद वाढवणे, गाव तेथे पक्षाची ध्येयधोरण सांगणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढविणे, शेतकऱ्यांना शासनाच्या योजना मिळवून देणे, सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढे उभा करणे याबद्दल माहिती दिली.

यावेळी जिल्हा चिटणीस म्हणून भाई धनंजय उद्धवराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. लवकरच तालुकापातळीवर तालुका अधिवेशन घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाला किरण खपले, भय्या कुतवळ, वकील अनिकेत देशमुख, अदित्य देशमुख, ईश्वर काळे,वकील बाळासाहेब लोमटे, मोहन गुंड, सोमनाथ गुजर,वकील श्रीहरी लोमटे, चत्रभुज भवर, विनायकराव शेटे, नारायण घोलप, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. गोपीचंद फावडे यांनी सूत्रसंचालन केले. बाबूराव जाधव यांनी आभार मानले.

महत्वाच्या बातम्या