पैलवान विलास डोईफोडेची महाराष्ट्र केसरीसाठी माती विभागातुन निवड

अंबड तालुक्यातील भार्डी या ग्रामीन भागातील कुस्तीवीर कुस्ती क्षेत्रात भरारी घेत गत वर्षी माती विभागातील फायनल ट्रिपलमधे पै.विजय चौधरीला टक्कर दीलेला पै. विलास डोईफोडे करणार महाराष्ट्र केसरीसाठी जालना जिल्ह्याचे माती विभागातुन खुल्या गटाचे प्रतिनिधीत्वत करणार आहे. भुगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे दिनांक 20 ते 24 दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातुन पै. विलास डोईफोडे यांची माती विभागातून आज जालना येथे निवड झाली.

मागील वर्षी माती विभागातुन रौप्य पदक पटकावनारा पै. विलास डोईफोडे हा बिराजदार मामांच्या गोकुळ वस्ताद तालीम पुणे येथे महा.केसरी दत्ता गायकवाड, गरुड वस्ताद व किसन शेळके यांच्या मार्गदर्शना खाली सराव करतो. मागील वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवित माती विभागात फायनलला तीनवेळा महाराष्ट्र केसरी राहिलेल्या पै. विजय चौधरी बरोबर लढलेला विलास डोईफोडे अगदी शांत आणि संयमी स्वभाव असलेला आहे घरची बेताची परिस्थिती असताना निव्वळ कष्टाच्या व मेहनतीच्या जोरावर अनेक पदक मिळवत येवढ्या उंची वर गेलेल्या पैलवानाचे पाय मात्र जमिनीवर आहेत. प्रेमळ संवाद आणि विनयशीलता या सर्वांचा संगम पै. विलास डोईफोडे कडे आहे विलासने आतापर्यंत

हिंद केसरी स्पर्धेत 97 कि. गटात काष्य पदक.
भोसरी येथील महाराष्ट्र केसरी अधिवेशनात 84 कि. गटात सुवर्णपदक. बाणेर केसरीचे मानकरी आणि मैदानी फडात महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांना चित केलेला पैलवान विलास हे श्री. समर्थ सह. साखर कारखाना अंबड चे मानधन धारक पैलवान आहेत

You might also like
Comments
Loading...