आम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार

टीम महाराष्ट्र देशा- कनार्टक विधानसभेच्या अध्यक्षांनी आपले राजीनामे स्वीकारावेत, असं कर्नाटकातल्या दहा आमदारांनी म्हटलं आहे, ते आज सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाच्या सुनावणीत बोलत होते. राजीनामा देणं हा आपला मूलभूत हक्क असून, विधानसभा अध्यक्षांनी तो नामंजूर केल्यास निर्माण होणाऱ्या स्थितीला आपण बांधील नसल्याचं, या आमदारांनी स्पष्ट केलं.

फक्त आपल्याला अपात्र ठरवण्यासाठीच हे राजीनामे प्रलंबित ठेवल्याचा आरोप, या आमदारांनी केला. कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारला पुढच्या काही दिवसांतच विश्वासमत सिद्ध करायचं आहे, त्या पार्श्वभूमीवर आमदारांचे राजीनामे नामंजूर करून, त्यांना पक्षाकडून जारी होणारं व्हिप पाळण्याची सक्ती केली जाऊ शकते, असं ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.