पुढच्या आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊ – देशमुख

टीम महाराष्ट्र देशा – सोलापूर जिल्ह्यात मराठा मोर्चाच्या आंदोलनाची धग तीव्र होत आहे. आज सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम सुरु झाले आहे. आंदोलकांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची सोलापूर मंगळवेढा महामार्गावर सकाळी दहा वाजता गाडी अडविली. पुढच्या आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊ असं आश्वासन देत सहकारमंत्री आंदोलकांच्या गराड्यातून कशीबशी सुटका करुन घेत निघून गेले.

नेमकं काय घडलं ?

माचणुर येथे आंदोलन सुरु असताना सहकार मंत्री सुभाष देशमुख हे या महामार्गावरून जात होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला. आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आपल्या मोबाइलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फ़ोन करत थेट आंदोलकांशी बातचीत करून दिली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलक संतापले. शेवटी पुढील आषाढ़ी पर्यंत आरक्षणाचा निर्णय होईल, नाही झाल्यास मी राजीनामा देईन असे सांगितले. त्यावर आंदोलकांनी पुढील वर्षी निवडणुका आहेत तुम्हाला राजीनामा देण्याची गरज राहणार नाही, असे सांगत तासभर सहकार मंत्र्याना सोडले नव्हते.

सरकार ‘मोदीं’चेच; संसदेतील अविश्वास दर्शक ठराव भाजपने जिंकला

विरोधकांनीही घेतला मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद – सुभाष देशमुख