ज्येष्ठ न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा राजीनामा

मुंबई : उच्च न्यायालयाचे द्वितीय ज्येष्ठ न्यायाधीश न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे आपण मुंबई सोडण्यास इच्छुक नाही आणि याच कारणास्तव आपल्याला अन्य राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही बदली नको आहे, असे कारण न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी राजीनाम्यासाठी दिले आहे.

न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी शुक्रवारी सकाळी बाराच्या सुमारास आपल्या न्यायदालनात आजचा आपला न्यायमूर्ती म्हणून शेवटचा दिवस असल्याचे सुनावणीसाठी हजर असलेल्या वकिलांना सांगितले.

‘मी ऑफीस सोडले आहे. आज माझा कामकाजाचा शेवटचा दिवस आहे,’ असे धर्माधिकारी यांनी कोर्ट रुममध्ये म्हटले. ‘सुरुवातीला मला ही मस्करी वाटली. ते ज्येष्ठ न्यायाधीश आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याने मला धक्का बसला,’ असे नेदुंम्बरा यांनी सांगितले.

दरम्यान, 14 नोव्हेंबर 2003 रोजी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळणार होती. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला.