मराठा आरक्षण : राजीनामे म्हणजे केवळ ढोंग : माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचा गंभीर आरोप

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. बुधवारी नाशिक बंद यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी नाशिकमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडे राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनानंतर नाशिकमधील काही सत्ताधारी आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, हे राजीनामे म्हणजे केवळ ढोंग असून, असा देखावा करणे चुकीचे असल्याचा आरोप माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे ?

आमदारांनी अशा प्रकारे राजीनामे देऊन केवळ ढोंगीपणा केला आहे. या राजीनाम्याला काहीही महत्त्व नसून आमदारकीचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे देणे अपेक्षित असून, त्यांनी अध्यक्षांकडे राजीनामे द्यावेत. मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनानंतर नाशिकमधील काही सत्ताधारी आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, हे राजीनामे म्हणजे केवळ ढोंग असून, असा देखावा करणे चुकीचे आहे. आमदारांनी राजीनामे दिलेच पाहिजेत, अशी बळजबरी नाही. परंतु, राजीनामे द्यायचे असतील, तर ते योग्य पद्धतीने द्यावेत.