केरळातील पुर मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशामुळे

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या शंभर वर्षात पाहिला नाही, असा भयानक पूर सध्या केरळात आला आहे. या अस्मानी संकटाने शेकडो लोकांचे जीव घेतले आहेत. तर कित्येक कोटींचे नुकसान झाले आहे. संपूर्ण देश केरळला पुरातून वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत आहे. अश्यातच रिझर्व्ह बँकेच्या हंगामी निर्देशकांनी मात्र, हा पूर म्हणजे सबरीमाला मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशामुळे आला असल्याचं सांगत तोडले अकलेचे तारे.

नेमकं क्या म्हणाले गुरूमूर्ती : 

भारतातल्या बुद्धिजीवींच्या ढोंगीपणावर मला आश्चर्य वाटत आहे. भारतात ९९ टक्के लोक आस्तिक आहेत. १०० टक्के लोक ज्योतिषविद्येवर विश्वास ठेवतात आणि त्यात अनेक बुद्धिजीवी, पुरोगामी, उदारमतवाद्यांचाही समावेश आहे. मीही देवाला मानतो,

आपण आपला जन्म किंवा मृत्यू बदलू शकत नसू, तर पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या परंपरा का बदलत आहोत, असा प्रश्न गुरूमूर्ती यांनी केला आहे. या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं असून, अशा प्रकारची वैचारिकता असलेला माणूस आरबीआयमध्ये कसा काय काम करू शकतो, असा सवालही उपस्थित केला आहे. जन्म आणि मृत्यूच्या त्यांच्या विधानावर एका नेटकऱ्याने या गोष्टीची दुसरी बाजूही पडताळून पाहा. तुम्ही महिलांना मनाई कराल, तर देव सगळ्यांनाच मनाई करेल, अशी वक्तव्य गुरूमूर्ती यांनी केली आहेत.

… तर स्त्यावरचे नमाज बंद करा