एनईएफटीची सुविधा आता चोवीस तास चालू ठेवण्याचा रिजर्व्ह बँकेचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा– नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर एनईएफटीची सुविधा आता चोवीस तास चालू ठेवण्याचा निर्णय रिजर्व्ह बँकेनं जाहीर केला. या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून या निर्णयावर अंमलबजावणी होणार आहे. रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेचे पतधोरण आढावा आज जाहीर केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

सध्या ही सुविधा कामकाजाच्या दिवसांत सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध असते. भारतीय रिजर्व्ह बँक आरबीआयने रेपो दरात शून्य पूर्णांक ३५ शतांश टक्क्यांनी कपात केली आहे. या निर्णयानंतर रेपो दर पाच पूर्णांक चाळीस शतांश टक्के तर, रिव्हर्स रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के इतका झाला आहे.

आज जाहीर झालेल्या पतधोरणात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर आधीच्या ७ टक्क्यावरुन खाली आणत सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के, तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवटयाचा दर ३ पूर्णांक एक दशांश टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. समितीची बैठक येत्या १ ऑक्टोबरला होणार आहे.

#महापूर : बचाव कार्यासाठी पंजाब एनडीआरएफची पाच पथकं दाखल

फडणवीस सरकारच्या निर्णयाने संजय मामांच फावलं, अविश्वास ठरावाची टांगती तलवार कायम