सवर्णांना आरक्षण : मोदी उत्तम फलंदाज,त्यांचा हा निर्णय मास्टरस्ट्रोकचं

Reservation for Scheduled Castes and Tribes in Army

टीम महाराष्ट्र देशा – पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर मोदी सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणावरून सरकार मोठी खेळी केली आहे. सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

रामदास आठवले यांनी केंद्र सरकारच्या कालच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम फलंदाज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोदींकडून आगामी काळात असे अनेक चौकार आणि षटकार पाहायला मिळतील, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा त्यांचा निर्णय मास्टरस्ट्रोकच आहे, असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे.Loading…
Loading...