मराठा आरक्षण : लोकसभेत प्रीतम मुंडेंकडून राज्य सरकार व मराठा समाजाचे अभिनंदन

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात आलेले आरक्षण हे घटनेच्या बाहेर नसून ते वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाबाबत बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मराठा समाजाचे व राज्य सरकारचे लोकसभेतील भाषणादरम्यान अभिनंदन केले आहे.

प्रीतम मुंडे यांनी मराठा समाजाने ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणाच दिली नाही, तर त्याप्रमाणे वागत आंदोलनाचा जगासाठी आदर्श करुन दिला, सरकारसोबतच या आरक्षणाचं श्रेय मराठा समाजालाही जातं, अस म्हणत अभिनंदन केले. तसेच पुढे बोलताना “महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय हा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संवेदनशीलपणे विषय हाताळत हा विषय मार्गी लावला. याचं श्रेय मराठ्यांनाही जातं. जगाने आदर्श घ्यावा अशा पद्धतीची आंदोलनं त्यांनी केली.

Loading...

तसेच ‘एक मराठा, लाख मराठा’ हे वाक्य त्यांनी फक्त म्हटलं नाही, तर ते जगलं. त्यामुळे त्यांनाही याचं श्रेय जातं. आरक्षण मिळालं नाही तर सरकारचा दोष मानला जातो, त्यामुळे निश्चितच याचं श्रेय भाजप आणि मित्र पक्षांनाही जातं. धनगर समाजाला सध्या अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा मिळत आहेत, पण त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल,” अशी अपेक्षाही प्रीतम मुंडेंनी व्यक्त केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?