काँग्रेस आमदार पुत्राने केलेल्या याचिकेमुळे ओबीसींचे आरक्षण गेले; पडळकरांचा गंभीर आरोप

gopichand padalkar

पुणे : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याची टीका भाजप नेते करत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला मोठा धक्का बसणार असून याला आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत आज भाजपने १ हजार ठिकाणी आक्रमक निदर्शने केले.

पुण्यात भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ‘ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष या दोघांनी सर्वोच्च न्यालयात केलेल्या याचिकेमुळे गेलं.’ असा आरोप त्यांनी केला.

‘२०१९ च्या डिसेंबर न्यायालयाने राज्य सरकारला सूचित केलं होतं की महाराष्ट्रातील ओबीसींचा सर्वे करा, त्यांचे मागासलेपण सिद्ध करा आणि जो इम्पिरिकल डेटा जमा होईल तो ओबीसींच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात सादर करा. पण तिथून पुढे १५ महिने झालेल्या सुनावण्यांमध्ये राज्य सरकारने केवळ पुढची तारीख द्या या पलीकडे कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यांनी फक्त केंद्राने डेटा द्यावा अशी मागणी करत सेन्सस डेटा कि इम्पिरिकल डेटा असा घोळ घातला आणि आज ओबीसींवर त्यांनी आज अशी वेळ आणून ठेवली,’ असा घणाघात देखील पडळकर यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या