मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही ?

भाजप प्रवक्त्याचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

टीम महाराष्ट्र देशा : नेहमी मुख्यमंत्री आणि भाजपची बाजू प्रखरयेने लावून धरणारे भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारला आहे. मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही?, असा सवाल भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना घराचा आहेर दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणी नंतर आता धनगर समाज सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आक्रमक झाला आहे. यात विशेष बाब म्हणचे भाजपचे नेतेच आघाडीवर दिसत आहेत. नेहमी पक्षाची बाजू मांडणारे भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना प्रश्न विचारला आहे.

धनगर समाजात असंतोष आहे. मराठा आरक्षणासाठी जेवढी तत्परता सरकार दाखवत आहे, तेवढी तत्परता धनगर आरक्षणासाठी दाखवली जात नाही, अशी खंत हाके यांनी लातूर येथे बोलताना व्यक्त केली आहे.

स्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून

You might also like
Comments
Loading...