fbpx

मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे – शरद पवार 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात मराठा आरक्षणानंतर आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचं दिसत आहे. यासंदर्भातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली आहे. मुस्लिम आरक्षण हे दिलेच पाहिजे. आज या देशामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेले हे घटक आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिमांसंबंधी विचार करावाच लागेल. अशी भूमिका शरद पवार यांनी मंडळी आहे.

दरम्यान,  पूर्वीच्या सरकारने आरक्षण देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला होता. कोर्टामध्ये त्या गोष्टीला मान्यता मिळाली, मात्र आज हे सरकार धर्माच्या आधारे देणार नाही असे बोलत आहे. धार्मिक आणि या अन्य धार्मिकतेबाबत एक वेगळी भावना भाजपच्या नेतृत्वाच्या मनात आहे. ही राष्ट्रीय ऐक्याला अनुकूल अशी भूमिका नाही आणि हा निर्णय अन्याय करणारा आहे. त्यामुळे येत्या काळात मुस्लिम, धनगर समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.