लष्करात अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षण द्या- रामदास आठवले

मुंबई : भारतीय लष्करातही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण द्या, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. लष्करात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आठवले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. बाबासाहेब आंबडेकर यांनी सांगिल्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाची सेवा करायला हवी. असेही आठवले म्हणाले. तसेच आठवले यांनी देशातील सर्व तरूणांना लष्करात भरती होण्याचे आवाहनही केले आहे. यापूर्वीही आठवले यांनी क्रिकेटमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण देण्याची मागणी केली होती.