मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण द्या : पुरुषोत्तम खेडेकर

टीम महाराष्ट्र देशा- नोकर्‍या संपल्या असल्याने तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे तसेच मराठा आरक्षणाची लढाई ही शांततेच्या मार्गाने लढणार आहोत. शासनाने सर्व मराठा समाजास कुणबी मराठा समजून सरसकट ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे, असे रोकठोक मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. जामखेड मध्ये बुधवारी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत मराठा जनसंवाद दाैरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खेडेकर बोलत होते.

यावेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, मराठा सेवा संघाचे जामखेड तालुकाध्यक्ष राम निकम, डॉ. राजेंद्र पवार, अशोक शेळके, महाडिक, शहाजी वायकर, डाॅ. सुहास सूर्यवंशी, आशिष पाटील, वाळेकर, खेंगरे, प्रा. शहाजी डोके, नारायण लहाने, हनुमंत निंबाळकर, बजरंग पवार, अवधूत पवार, संभाजी ढोले, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात, दिगंबर पवार आदी होते.

खेडेकर म्हणाले, ‘इंग्रज सरकारने केलेल्या नोंदीत मराठ्यांचा मराठवाडा वगळता सर्वत्र कुणबी असाच उल्लेख आहे. कुणबी ही जात ओबीसीमध्ये आहे. याचा फायदा अनेक मराठा नेत्यांनी राजकीय पदांसाठी केला आहे. सध्याच्या काळात शासकीय नोकऱ्या संपल्या आहेत. मराठा तरुणांनी आवडेल ते काम करून मराठा समाजानेच समाजाचा विकास करणे हाच एकमेव उपाय असून प्रत्येकाने आपल्या घरात शिवाजी तयार करून त्याच्या पाठीमागे आई-वडिलांनी खंबीर उभे राहिले पाहिजे,असे खेडेकर म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी  मराठा मोर्चे हे उत्स्फूर्त नव्हते, असे खळबळजनक विधान खेडेकर यांनी केले आहे. मोर्चा हा कधीच उस्फूर्त निघत नसतो. मराठा मोर्चामागे असलेली अदृश्य शक्ती कोण, हे पाहायला हवे, असेही ते म्हणाले होते .

मराठा समाज करणार रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना

भाजपवर नाराज झालेले लोक लगेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळतील असे नाही : सौरभ खेडेकर

Loading...