दोन नगरपरिषदांसह तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

मुंबई  : राज्यातील नवनिर्मित 2 नगरपरिषद व 3 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत आज नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी आमदार बाळा भेगडे, सहसचिव संजय गोखले, अवर सचिव सचिन सहस्रबुध्दे आदी उपस्थित होते.

शिरोळ व बुटीबोरी नगर परिषदा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी या दोन नगरपरिषदा या सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.

नगरपंचायतींचे आरक्षण-
राज्यातील शेंदुर्णी, मुक्ताईनगर (दोन्ही जि. जळगाव) व वडगाव मावळ या तीन नगर पंचायतींपैकी शेंदुर्णी नगरपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर मुक्ताईनगर नगर पंचायत ही अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव झाली असून वडगाव मावळ नगर पंचायत सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

5 Comments

Click here to post a comment