रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांकडून निषेध

raosaheb-danve

टीम महाराष्ट्र देशा: गावातील कार्यकर्त्याला इथे बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक! सांगून भाजप मेळाव्याला गर्दी जमवा, असे अजब सल्ले रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे नेटकऱ्यांनी रावसाहेब दानवे यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने ६ एप्रिलला मुंबईत बांद्रा-कुर्ला मैदानावर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे यांनी अजब सल्ले दिले आहेत. त्यामुळे कोणी त्यांच्यावर टीका करत आहे तर कोणी खिल्ली उडवत आहे.

”लोकांना बिडी, सिगारेट सल्ले देणारे लोकप्रतिनिधी असतील तर, काय भले होणार ?” असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ”जनतेला एवढेही चिल्लर समजू नका, हीच जनता तुम्हाला एक दिवस घरी बसवील, अश्या संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे ?

मेळाव्यासाठी गर्दी जमवण काही अवघड आहे का? असा सवाल करतांनाच गावात बिडी फुकत बसलेल्या कार्यकर्त्याला मुंबईला फुकट जायच, फुकट यायंच सांगा. त्याला म्हणा इथे बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक! पहा हा फॉर्म्युला वापरून! असा अजब सल्ला रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला. ते पुढे म्हणाले, गावाकडील कार्यकर्त्यांना मुंबईच आकर्षण असते. भाजप स्थापना दिवसाच्या निमित्ताने भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला मुंबईत आणा, त्याला मुंबई दाखवा.

rawsaheb danave

पहा व्हिडीओ…