fbpx

धुळे महानगरपालिका परिक्षेत्रात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत आयुक्तांना निवेदन

टीम महाराष्ट्र देशा – धुळे मनपा च्या विविध प्रभागमध्ये विविध प्रकारच्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाल्याचं चित्र आहे. याविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनाला प्रभावित करणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज युवा नेते आणि भारतीय जनता युवा मोर्चा धुळे जिल्हा सरचिटणीस रोहित चांदोडे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले. अशुद्ध पाण्याचा पुरवठा , कचरा समस्या, सिग्नल यंत्रणा या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून त्वरित या समस्या दूर कराव्यात असं निवेदनात म्हटलं आहे. जर प्रशासनाकडून मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले तर आगामी काळात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी चांदोडे यांनी दिला.

नेमक्या कोणत्या मागण्यांचा निवेदनात समावेश होता ?

१) मनपा हद्दीतील सर्व सिग्नल यंत्रणा सुरू करावी तसेच महत्वाच्या आणि रहदारी च्या भागात नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी.
२) सध्या शहरात सुरू असलेल्या अनियमित आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा बंद करून स्वच्छ आणि सुरळीत पाणी पुरवठा करन्यात यावा.
३)मनपा तर्फे विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासावी.
४) आग्ररोड हा नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात यावा तसेच त्या भागातील हॉकर्स ना इतर परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी.
५) शहरात अनेक भागात ठेवण्यात आलेल्या कचराकुंडीची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी.
६) धुळे महानगरपालिकेची वेबसाईट अपडेट करून त्यावर आलेल्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे.
७) शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेले हायमास्ट लाईट , तसेच स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे ,ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे.
तरी आपण वरील मागण्या लवकरात लवकर मान्य करा.

भाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही – उद्धव ठाकरे

काँग्रेसमधील घडामोडीत सुशीलकुमार शिंदेंनी लक्ष घालावे – महेश कोठे

1 Comment

Click here to post a comment