भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सातारा : भीमा कोरेगाव व परिसरातीली नैतिक जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्री हटाव बाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विविध आंबेडकरी संघटना व पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून दिला आहे.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव दंगल पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते, प्रशासनाची भूमिका पक्षपाती असल्याचे प्रत्यक्षदर्शीच्या अनुभवावरुन दिसून येते, भीमा कोरेगावच्य अनुसंगाने त्या परिसरातील गावानी अघोषित बंद पाळून जातीय मानसिकतेतून सामाजिक बहिष्कार टाकल्याचे दिसून येते, दंगलीमध्ये शेकडो गाड्यांची तोडफोड झाली, शेकडो लोकांची डोकी फुटली, काही लोक मरण पावले, काही अत्यावस्थ आहेत, लोकांचे आर्थिक नुकसान करण्यात आले, त्यामध्ये दुकाने जाळणे, शेत जाळणे असे प्रकार घडले आहेत.

भीमा कोरेगाव परिसरातील दलित जनता दहशतीच्या व असुरक्षिततेच्या छायेखाली आहे. सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी या वेळी चंद्रकांत गंडाईत, लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे, शितल साठे, गणेश भिसे, सचिन माळी, सिध्दार्थ खरात, गौतम वाघमारे, मिनाज सय्यज, विजय मांडके, भगवान अवघडे, जयंत उथळे, राजेंद्र कांबळे, कृष्णा गव्हाळे, काका गाडे, अमर गायकवाड आदी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...