दौंड : पाटस बस डेपोसाठी परिवहन मंत्र्यांना निवेदन

दौंड, सचिन आव्हाड : दौंड तालुक्यातील पाटस येथे बस डेपो व्हावा यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना भेटुन शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेश पासलकर यांनी निवेदन दिले आहे. पाटस येथील विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी पाटस येथील नियोजित जागेवर बस स्थानक करण्यात यावे अशी मागणी पासलकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पाटस येथे बस स्थानक झाल्यास आसपासच्या गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. जणभावनेचा विचार करून पाटस येथे नियोजित जागेवर बस स्थानक करण्यात यावे अशी मागणी पासलकर यांनी केली आहे.