मोदी सरकारच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने केले चॉकलेटचे वाटप!

औरंगाबाद : एकीकडे कोरोनामुळे आधीच सर्व काही बंद होते. त्यात दुसरीकडे लोकांच्या हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली असताना पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेलाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील पेट्रोल पंपावर चॉकलेट वाटप आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरु होती.

सर्वसामान्य जनता आधीच आर्थिक समस्येने परेशान आहे. त्यात आणखी महागाई कशाला? असा प्रश्न उपस्थित करत पेट्रोल, डिझेड, घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने शहरातील दिल्ली गेट, रांजणगाव येथील पेट्रोल पंपावर चॉकलेट वाटप आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने आज पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेलाचे वाढते दर कमी करावे. तसेच जे कर लावले आहेत ते रद्द करावेत. अशी मागणी करत चॉकलेट वाटप करून निषेध व्यक्त केला. तसेच वारंवार केंद्रशासनाच्या वतीने आश्वासनांचे चॉकलेट दिले जाते. ते पूर्ण देखील करावे आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करावा अशी मागणी सिद्धोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, सचिन निकम, मिलिंद बनसोडे, आदींच्या वतीने करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP