fbpx

लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे गेलेले अस्तित्व पुन्हा निर्माण करणार – रामदास आठवले

मुंबई – एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे 1998 मध्ये चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनंतर 1999 मध्ये रिपाइं चे दोन खासदार लोकसभेत निवडून गेले त्यानंतर सन 2004 साली एकमेव मी खासदार म्हणून लोकसभेत निवडून आलो त्यानंतर सन 2009च्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाची लोकसभेतील नोंद संपुष्टात आली. राज्यसभा खासदार म्हणून संसदेत रिपब्लिकन पक्षाची नोंद असली तरी लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातुन लढणार असल्याचे सांगत शिवसेना महायुती सोबत आली तरी आणि नाही तरी रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या बळावर आणि भाजपच्या पाठिंब्यावर आगामी लोकसभा निवडणूक आपण जिंकणार असल्याचे आत्मविश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

चेंबूर जिमखाना येथे रिपब्लिकन पक्षाच्या अणुशक्ती नगर आणि चेंबूर विधानसभेतील रिपाइं चे कार्यकर्ते आणि दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रमुख मार्गदर्शन ना रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपाइं चे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ लढविण्याचा निर्णय ना रामदास आठवले यांनी घेतला असून त्याबाबत मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जरी शिवसेनेकडे असला तरी हा मदारसंघ रिपब्लिकन पक्षाला ना आपल्या उमेदवारीसाठी सोडवून घेण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपणास दिले असल्याचे ना रामदास आठवलेंनी सांगितले.

अट्रोसिटी कायद्याला पूर्ण संरक्षण देणारे विधेयक केंद्रियमंत्रीमंडळाने मंजूर केल्याबद्दल रिपाइं कार्यकर्त्यांनी यावेळी ना रामदास आठवलेंचा भव्य सत्कार केला .

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे बूथ कमिटी स्थापन करण्याची तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याची सूचना करण्यात आली. येत्या दि 3 ऑक्टोबर ला ठाण्यात रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित महामेळाव्यात शक्तिप्रदर्शन घडविण्याचे आवाहन यावेळी ना रामदास आठवलेंनी कार्यकर्त्याना केले. तसेच दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा येत्या 27 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवलेंना विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला. जेंव्हा कार्यकर्ते रक्त आटवतील तेंव्हाच ते मला लोकसभेत पाठवतील अशी चारोळी सादर करून यापूर्वीच्या प्रकचारातील चुका टाळून पूर्ण ताकदीनिशी आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विजयासाठी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन ना रामदास आठवलेंनी यावेळी केले.

यावेळी रिपाइं चे अविनाश महातेकर, दिपकभाऊ निकाळजे, गौतम सोनवणे,सिद्धार्थ कासारे, दयाळ बहादूरे, फुलाबाई सोनवणे, एन जी वाघमारे, साधू कटके, जगदीश गायकवाड, कामु पवार, अनिस पठाण, महादेव साळवे, संजय डोळसे, सतीश चव्हाण, हेमंत रणपिसे, नितीन तायडे, अमर कसबे, रवी गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘लोकसभा २०१९’ निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी होतील, पण…!- रामदास आठवले