प्रजासत्ताक भारताला मोदींकडून फास ; राज ठाकरेंची जहरी टीका

raj-thackeray

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याची बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नवं कार्टून सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

नव्या कार्टूनमध्ये प्रजासत्ताक भारत दाखवला आहे. या भारताच्या गळ्यात दोरी आहे, ही दोरी मोदी आणि शहा यांनी ध्वजारोहणाप्रमाणे ओढली आहे, त्यामुळे प्रचासत्ताक भारताला गळफास लागला आहे, असं कार्टून राज यांनी काढलं आहे. या कार्टूनला ‘स्वतंत्रता न बघवते’ असं हेडिंग दिलं आहे. तर मोदी आणि शाह यांच्याजवळ ‘मोदींचे हात बळकट करा’असं म्हटलं आहे. याअगोदर राज ठाकरेंच्या टीकेला भाजपने व्यंगचित्रातूनच उत्तर दिले होते. आता राज ठाकरेंच्या या चित्राला भाजपा कशा पद्धतीनं उत्तर देते, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.