‘गणतंत्र हे संघतंत्र होऊ नये, याकरिता लढणे हाच संकल्प’

sachin savant

पुणे : यावर्षीचा प्रजासत्ताकदिन वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज राजपथावर हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले आहे. जवानांच्या भव्य परेडनंतर लाखो शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड दिल्लीत सुरु झाले आहे. देशाच्या राजधानीत ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमतोय. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अर्थसंकल्प सादर होणाऱ्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोदी सरकारने मनमानी पद्धतीने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी दोन महिन्याहून अधिक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, यावर शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे. यावरून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत आहेत.

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ट्वीट करत मोदींवर टीका केली आहे. ‘प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली असून ‘गणतंत्र’ हे संघतंत्र’ होऊ नये याकरिता लढणे हाच संकल्प ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने योग्य आहे. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो हे म्हणताना तो चिरायू राहावा ही जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’ असे म्हणत त्यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या