गोष्ट त्या शूर जवानाची जी ऐकून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुद्धा झाले अश्रू अनावर..!

टीम महाराष्ट्र देशा: तारीख होती १८ नोव्हेंबर २०१७ जम्मू काश्मीर च्या बांदीपोरा जिल्ह्यातील चंदननगर गावात काही आतंकवादी असल्याची सूचना मिळाली होती. या आतंकवाद्यांच्या विरोधात मोहीम चालवण्याची जबाबदारी होता ती ‘राष्ट्रीय राइफल्स’ यांच्याकडे. ‘राष्ट्रीय राइफल्स’ या टुकड़ी मध्ये इंडियन एयरफोर्स चे गरुण कमांडोज देखील असतात गरुण कमांडो ही आपल्या हवाईदलाची एक तुकडी आहे. जी जमिनीवर सुरु असलेल्या ऑपरेशनला निष्कर्षांकडे नेते. २०१६ मध्ये जेव्हा पठानकोट एयरबेसवर हल्ला झाला होता तेव्हा ठरवल होत की भारतीय हवाईदलाची गरुण कमांडोज टुकड़ी राष्ट्रीय राइफल्स बरोबर अटैच राहील. जानेवारी २०१६ मध्ये हा निर्णय झाला होता. कश्मीरमध्ये जेव्हा आतंकवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन होते, तेव्हा राष्ट्रीय राइफल्सच्या जवनांबरोबर गरुण कमांडोजची टीम ठिकाणावर पोहचली या तुकडीचे नेतृत्व करत होते ज्योति प्रकाश निराला.

राष्ट्रीय राइफल्स आणि गरुण टुकड़ी बरोबर जेव्हा ज्योति प्रकाश निराला गावात पोहचले तेव्हा आतंकवादी एका घरात लपल्याची त्यांना सूचना मिळाली. आपल्या सैनिकांनी चारही बाजूने त्या घराला घेराव घातला. तर शूर ज्योती प्रकाश निराला घराच्या एकदम जवळ जाऊन आडोशाला उभा राहिले. आपल्या सैनिकांनी आतंकवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र तितक्यातच समोरून त्यांनी गोळीबार सुरु केला. याला आपल्याही सैनिकांनी चोख प्रतीत्युत्तर देत जोरदार गोळीबार सुरु केला. एवढ्यात गोळीबार करत सहा आतंकवादी घराच्या बाहेर पाळण्याचा प्रयत्न करू लागले. या दरम्यान आतंकवाद्यांची गोळी ज्योति प्रकाश निरालांना लागली. शूर निरालांनी तितकाच जोरदार प्रहार करत हाथगोळे आणि गोळ्यांनी आतंकवाद्यांवर एकच हल्ला चढवला आणि या महापराक्रमी शूर वीराने एकट्यानेच तीन आतंकवाद्यांना कंठस्नान घातल. यादरम्यान आतंकवाद्यांची ‘नापाक’ गोळी लागून आपले हे शूर वीर ज्योति प्रकाश निराला शहीद झाले. श्रीनगरमध्ये झालेल्या या चकमकीत आतंकी मसूद अजहरचा भाचा तल्हा रशीद याला आपल्या सेनाने यमसदनी पाठवल.

Loading...

ज्योति प्रकाश निराला यांच्या बहादुरीचे किस्से राष्ट्रीय राइफल्स बरोबर इंडियन एयरफोर्स साठी एक मिसाल बनले आहेत. निरालांच्या शहीद झाल्यानंतर सरकारकडून त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात आल. निराला इंडियन एयरफोर्सचे पहिले सैनिक आहेत ज्यांना ग्राउंड ऑपरेशन साठी सन्मानित केल गेलंय.

ज्योती प्रकाश निराला बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील रहिवासी होते. वयाच्या ३१ व्या वर्षी देशासाठी शहीद झालेल्या या शूर सैनिकाच्या मागे म्हातारे आई-वडील , पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. निराला यांच्या तीन बहिणी आहेत ज्यांचे लग्न होणे अजून बाकी आहे.

२६ जानेवारी २०१८ ला जेव्हा देश आपला ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत होता तेव्हा खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद शहीद ज्योति प्रकाश निराला यांच्या पत्नीला हा सन्मान प्रदान करत होते. यावेळेस त्यांच्या डोळ्यात सुद्धा भारतमातेच्या या शूर पुत्रासाठी पाणी तराळले होते.