कळवा दुर्घटना : ‘संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावा’ ; दरेकरांची मागणी

darekar

मुंबई : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे काल ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथं डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 जण जखमी होते. या जखमींची भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली.नंतर दरेकर हे कळवा येथील दरड दुर्घनेत मृत्य कुटुंबियाचे नातेवाईक आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.

यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधाल. यावेळी बोलताना ते महाले कि, ‘ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अगदी निरागस बालिका जखमी झाली आहे. तिच्या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची पुसट कल्पना देखील तिला कल्पना नाही. ही मन हेलवणारी घटना आहे. मुंबईत विक्रोळी, चेंबूर, भांडुपला आशा घटना घडल्या. त्याला भूमाफिया जबाबदार असल्याचा आरोप दरेकर यांनी केलाय. ज्या ठिकाणी आशा घटना घडल्या आहेत, तिथल्या संबंधित अधिकारी कोण होते? त्यांनी परवानगी होती का? याची माहिती घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावावा,’ अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

तसेच ‘सरकार संवेदनाहीन आहे. ते तातडीनं काम करत नाही. निकृष्ट दर्जाचे काम, त्यामुळे पडणारे बळी हा सरकारचा निष्काळजीपणा आहे. अशा दुर्घटनानंतरही आमच्या संवेदना जागा होत नसतील तर काय? गेंड्याच्या कातडीचे राज्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP