‘विमानतळाची मुख्यालयं मुंबईतच राहतील’ ; अदानी समूहाने दिले स्पष्टीकरण

adani

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. अशा प्रकारच्या चर्चा आज सकाळपासूनच रंगू लागल्या होत्या. मुंबईचे हे विमानतळ आता पूर्णपणे ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या ताब्यात गेले आहे. त्याबरोबर एएएचएलचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले आहे. अशा टीका देखील झाल्या होत्या.

मात्र आता अदानी समूहानं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यालय हलवण्याबद्दलचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करत तशा चर्चा निव्वळ अफवा असल्याचं अदानी समूहानं म्हटलं आहे. ‘मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला नेणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची मुख्यालयं मुंबईतच राहतील. मुंबईच्या अभिमानात भर घालत राहू हा आमचा शब्द आहे. आमच्या विमानतळांच्या साखळीतून आम्ही रोजगारांच्या हजारो संधी तयार करू,’ असं अदानी समूहानं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान आज सकाळपासूनच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी या मुद्याला धरून चांगलेच रान उठवले असल्याचे पाहायला मिळाले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील यावर भाष्य केले होते, ‘२०१४ नंतर मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी गुजरातला कशा नेता येतील हा प्रयत्न सुरू आहे. असं केल्याने मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही.’ असे ठाम मत यावेळी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते.

तर ‘तुम्ही गरबा कराल, तर आम्हाला झिंगाट दाखवावा लागला,’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अदानी समूहाला इशारा दिला होता. त्यानंतर काँग्रेसनं थेट मोदी सरकारवर निशाणा साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात्यांचा मुंबईवर डोळा असल्याचे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP