भंडारा – गोंदिया पोटनिवडणूक फेरमतदान; ईव्हीएम मशीनमध्ये आजही बिघाड

भंडारा – भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा – गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकी दरम्यान काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनी याठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली होती.

दरम्यान अशा ४९ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला असून, या मतदान केंद्रांवर आज फेरमतदान घेण्यात येत आहे. मात्र आजही मतदान यंत्रातील बिघाडाच्या घटना घडत आहेत. गोंदिया शहरातील माताटोली येथील मतदान केंद्र 233 वर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय.बटण दाबल्यानंतर तब्बल 10 मिनिटांनी मतदान होतं असल्याचं समोर आलं आहे.