योग्य वेळ आल्यावर उत्तर दिले जाईल, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्यांकडून युतीसाठी आग्रह धरला जात असताना मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळ आल्यावर उत्तर दिले जाईल. असे सूचक विधान केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावर रान उठवले आहे. अयोध्येनंतर पंढरपूरवारीकरत ठाकरे यांनी भाजप नेतृत्वावर निशाणा साधला. शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत असताना सर्व पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मात्र शिवसेना शेतकरी आणि दुष्काळासाठी काम करत आहे. जागावाटप खड्ड्यात गेलं, आधी शेतकऱ्यांचं बघा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला होता.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीकविमासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी, योग्य उत्तर दिलं जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.