मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करणार असल्याचे रेणू शर्माने म्हटले होते. धनंजय मुंडे यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. आता मुंबईच्या गुन्हे शाखेने तिला आज अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.
रेणू शर्मा ही मूळ इंदौर येथील असून करुणा शर्मा यांची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून इंदौर कोर्टात हजर केले होते. इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला असून आज (२१ एप्रिल) तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
धनजंय मुंडे यांनी तक्रारीत आपण सदरील महिलेला ओळखत असल्याचे म्हटले होते. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले असून एक मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता, असे धनजंय मुंडे यांनी म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार या महिलेने याअगोदरही ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांचे दुकान आणि मोबाईलची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास बदनामी करण्याची धमकी या महिलेने दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी या महिलेची तक्रार मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
महत्वाच्या बातम्या:
- “माझ्या भावाच्या घरी कधीच रेड…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- “…म्हणून संजय राऊतांना राजसाहेब ‘लवंडे’ म्हणतात”, ‘मनसे’नी पुन्हा डिवचले
- राज्य नेमके किती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून चालवत आहेत?; ‘त्या’ प्रकरणावरून भातखळकरांचा टोला
- “कुणाला वाटत असेल द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल पण…”, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा
- ST कर्मचाऱ्यांची कुटुंबे आता सदावर्ते पोसणार आहे काय?; संजय राऊतांचा सवाल