fbpx

कॉंग्रेसने अपमान केला तरीही पवारसाहेब त्यांच्यासोबत – मोदी

narendra modi with sharad pawar

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये असणारे मैत्रीपूर्ण संबंध कायम चर्चेचा विषय बनतात. महाआघाडीतील प्रमुख विरोधी चेहरा असणारे पवार यांना मोदी यांनी अनेकवेळा चुचकारत कॉंग्रेसची कोंडी केली आहे. आता जेष्ठ नेते असून देखील कॉंग्रेसने शरद पवार यांना अपमानास्पद वागणूक दिली. आजवर पवार यांनी जनतेसाठी काम केले, मात्र केवळ कॉंग्रेस अध्यक्षपदावर दावा केल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. तरीही शरद पवार यांच्यासोबतच असल्याच म्हणत, नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि कॉंग्रेसला टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देशभरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद सुरु केला आहे. बुधवारी त्यांनी राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी बारामती, इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर , खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील हजारो भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपमध्ये पक्षाचे निर्णय कार्यकर्ते घेतात, कोणत्याही एका परिवाराची मनमर्जी चालत नाही. आपण भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे म्हणतो त्यावेळी राजकारणातून काँग्रेस संस्कृती संपवायची आहे, असा अर्थ होत असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

1 Comment

Click here to post a comment